१९ प्रसिद्ध मराठी चारोळ्या – Marathi Charolya – चंद्रशेखर गोखले

मला माहित होतं तू मागे वळून पाहशील.
मागे वळून पाहण्याइतपत तू नक्कीच माझी राहशील.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

ठाऊक असत तुझं येण अशक्य आहे
तरी मन तुझी वाट पाहण सोडत नाही
मी हि म्हणतो , जाऊदे,
मी त्याच मन मोडत नाही

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

नेमका जो विषय टाळायचा. तोच आपण काढतो.
आणि वादाच्या रूपाने का होईना. आपल्या भेटीचा वेळ वाढतो.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

तु समोर असलीस की नुसतच तुला बघणं होतं
आणि तू जवळ नसतांना तुझ्या सोबत जगणं होतं.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

नेहमीच डोक्याने विचार करू नये कधी भावनांना हि वाव द्यावा
आसुसलेला डोळ्यांना कधी तरी स्वप्नांचा गाव द्यावा.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका.
जरी तुमच्यात बसलो तरी, माझ्या असण्यावर जाऊ नका.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा
वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयतेने पाहणारा.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

तु गेल्यावर वाटत खुप काही सांगायच होत
तु खुप दिले तरी आणखी मागायचं होतं.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

इथे वेडे असण्याचे खुप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत.

चंद्रशेखर गोखले

ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्य़ा जरा थरथरल्या म्हणून गूपीत तुला कळले.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

तुझं हे नेहमीचंच झालय आल्या आल्या निघणं
मी जाते, मी निघते म्हणताना, मी थांबवतोय का बघणं.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

कापरासारखं जळणं मला कधीच पटत नाही,
तसं जळण्यास माझी ना नाही. पण शेवटी काहीच उरत नाही.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं तर दुसर्‍याने आवरायचं

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा मी दुसरं काही मागत नाही.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे,
भुतकाळ आठवायचाच तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे
ही माझी कल्पना नाही. हा माझा दावा आहे.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

एकदा मला ना, तू माझी वाट पाहतांना पाहायचंय.
तेवढ्यासाठी आडोशाला, हळूच लपून रहायचंय.

प्रसिद्ध मराठी चारोळ्या - Marathi Charolya - चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले

जेव्हा तू माझा , अलगत हात धरलासं.
खरं सांग तेव्हा, तुझ्याजवळ तू कितीसा उरलासं.

Special Quotes
24 Things Children Should Learn
२१ चाणक्य के विचार – Chanakya Niti Quotes in Hindi
7 Most Amazing Love Quotes
21 Most Famous Paulo Coelho Quotes on Love
13 Heart Breaking Shayari
27 Best Shayari In the Memory of Late Rahat Indori
5 Unforgettable Friends Series Quotes
8 Quotes To Remember from ‘Hello, My Name Is Doris’
66 Ways To Thank Someone
16 Famous Law Quotes
19 One-Sentence Quotes That Will Leave You Speechless
32 Empowering Quotes For Girls
21 Quotes by Gulzar in Hindi
15 Adorable Quotes About Mother
45 Attitude Quotes For Boys
13 Bible Quotes About Love
18 Sarcastic Office Quotes
19 Superb Real Estate Quotes
18 Health Awareness Quotes
22 Realistic Quotes For You
27 Social Media Quotes
21 Bored Of Studying Quotes
12 Khaled Hosseini Book Quotes
13 ‘The Pursuit Of Happyness’ Quotes
16 Clever Quotes On Innocence
12 Inspiring Nick Vujicic Quotes
16 Amazing Quotes by Rick Riordan
14 Quotes On Happiness
10 Funny Quotes For A Good Laugh
19 Marathi Charolya by Chandrashekhar Gokhale
14 Back To School Quotes
15 Inspirational Christian Quotes
23 Admirable Parenthood Quotes
19 Fruity Quotes

Published by Sulbha

Tea Sipper, Avid Reader, Traveller and a Blogger.

Leave a Reply

%d bloggers like this: